अमरावती- आज प्रेमाचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे तरुण-तरुणींमध्ये खूप आकर्षण असते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण आजच्या दिवसाची वाट पाहत असतात. पण, अमरावतीच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना अजब शपथ देण्यात आल्याची घटना घडली आहे. 'मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही,' अशी शपथ देण्यात आली. त्यावर आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलींकडून अशा शपथा घेण्यापेक्षा 'मी मुलींना त्रास देणार नाही,' अशी शपथ मुलांकडून घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुलींनाच शपथ का..? त्यापेक्षा मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांना द्यायला हवी- पंकजा मुंडे